ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

महाराष्ट्रातील हवामानावर आधारीत कृषि सल्ला; घ्या ‘या’ पिकांची काळजी

कृषी सल्ला –

शेतकरी बंधूंनो फवारणी करताना सुरक्षात्मक साधनांचा वापर करून फवारणी करा. शिफारस केलेली मात्रा व वापरासंबंधी सूचनांचे पालन करावे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका. फवारणी करणाऱ्यांनी स्वतःचे डोळे, नाक,कान, तोंडतों आणि हात या अवयवांच्या सुरक्षेची दक्षता घ्यावी. फवारणीनंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

संदेश सल्ला :

शेतकरी बंधूंनी पिक संरक्षणासाठी योग्य वेळी फवारणी, खत नियोजन, आंतरमशागत ई. कामे पावसाचे पुर्वानुमान व स्थानिक हवामान लक्षात घेऊनच करा.

वाचा –

पिक निहाय सल्ला:

उडीद- परिपक्व झालेल्या उडीद पिकाची काढणी व मळणी पावसाचे पूर्वानुमान लक्षात घेऊन करावी व मळणी केल्यानंतर उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा.

कपाशी – शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतामध्ये पिकावरील गुलाबी बोंडअबों ळीच्या नर पतंगाचे नियमित निरीक्षण करावे. प्रादुर्भाव असलेल्या शेतात कीटकनाशकाच्या फवारणी पूर्वी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या, फुले तोडून नष्ट करा.

मका – मक्याचे पिक सध्या दुधाळ/ कणसे भरण्याच्या अवस्थेत असल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी शक्य नसल्याने नियमितपणे मजुरांच्या सहाय्याने अळ्या वेचून नष्ट करा.

तूर- शेतात पावसाचे अतिरिक्त पाणी जास्त काळ साचून राहिल्यास तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येते. म्हणून प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड @ ५ ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रती लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करून तुरीच्या झाडाला आळवणी करा.

सोयाबीन – सोयाबीन पिकातील शेंगांवरील करपा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात येताच टेबुकोनॅझॉल २५० ई.सी. १.२५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना कोरडे हवामान व पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करा.

ज्वारी- रबी ज्वारीच्या पेरणीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी व पेरणी पावसाची उघडीप पाहून २५ सप्टेंबर नंतर करा.

वाचा-

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:

कागदी लिंबू – लिंबू फळबागेत पावसाची उघडीप पाहून कोरड्या हवामानात आंतरमशागत करून बाग तणमुक्त ठेवा.

वांगे – शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतातील किडग्रस्त शेंडे अळीसह तोडून नष्ट करावेत व पिकावर कार्बारील ५० टक्के ( पाण्यात मिसळणारी भुकटी ) ४० ग्रॅम किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही ३.० मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून कोरड्या वातावरणात फवारा.

मिरची – मिरची पिकावर चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पिक फुलावर येईपर्यंत त्याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड या कीडनाशकाची २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने फवारण्या पाऊस नसताना कोरड्या हवामानात करा.

सिताफळ- सीताफळ बागेत तणांचे प्रमाण वाढले असल्यास बागेत पिठ्या ढेकुनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी बंधूंनी पावसाची उघडीप पाहून बागेत आंतरमशागत करून बगीचा तणमुक्त ठेवा.

पेरू – पेरू फळझाडांना सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांची लागण होऊ नये म्हणून कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी पाऊस पडून गेल्यानंतर करा.

संत्रा – जास्त पाऊस ज्या भागात झाला आहे अशा ठिकाणी फायटोप्थोरा बुरशीची फळावर वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे कुजून गळू शकतात. अशी प्रादुर्भावग्रस्त फळे संत्रा बगिच्यामध्ये निदर्शनास येताच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फोसॅटील अॅल्युमिनिअम (२.५ ग्रॅम/लिटर) पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या करा.

पशुधन विषयक निहाय सल्ला-

बकरा किंवा बकरी- शेळ्यामध्ये पावसाळ्यात विशेषतः पोटात जंतूंची व परजीवींची वीं संख्या वाढते. त्यासाठी उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना जंतनाशकाची मात्रा योग्य ठेवा.

कुकुटपालन विषयक निहाय सल्ला –

पक्षी – कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या पानाची भुकटी २ ग्रॅम प्रती दिवस याप्रमाणे १५ दिवस द्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button