ताज्या बातम्या

Online Game | ऑनलाईन गेममुळे तरुण पिढीच्या मनावर होतोय परिणाम? जाणून घ्या कोणती आहे ‘ही’ गेम!

Online Game | मोबाईलच्या (Mobile) बिघाडामुळे एखाद्याची तब्येत बिघडत, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? जर तुम्ही ऐकले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (Very important) आहे. ऑनलाईन गेम (Online Games) खेळण्याचे व्यसन लहान मुले आणि तरुणांमध्ये वाढत आहे. अक्षरशः तरुण पिढी तहान भूक विसरून गेम खेळताना दिसत आहेत.

कित्येकदा मुलांना त्यांच्या आसपास घडत असलेल्या घटना देखील जाणवत नाहीत. इतके ते खेळात बेधुंद झालेले असतात. मात्र, अशाच एका ऑनलाईन गेम लवरचा किस्सा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

वाचा: Linking Ration To Aadhar Card | सरकारने रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची वाढवली तारीख, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता लिंक

राजस्थानमधील (Rajasthan) चित्तोडगड जिल्ह्यातील बनसेन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 22 वर्षीय इरफानला फ्री फायर(Free fire) या ऑनलाईन गेमचे व्यसन लागले आहे. तो गेम खेळण्यात इतका मग्न झाला आहे की, ऑनलाईन गेम खेळली जाती तशीच तो रियल आयुष्यात गेम खेळत आहे.

दरम्यान, इरफान काही दिवसांपूर्वी बिहारमधून घरी परतला आहे. तेथे तो संपूर्ण वेळ खेम खेळण्यात घालवत असायचा. फ्री फायर ही ऑनलाइन गेम खेळण्याचे त्याचे व्यसन गावात आल्यानंतरही सुटले नाही. गुरुवारी रात्री गेम खेळत असताना अचानक त्याचा फोन बंद पडला. तेव्हापासून तो वेड्यासारखा वागू लागला.

वाचा: शेतकऱ्यांनो, ड्रोनच्या माध्यमातुन करा पिकांवरील किडीचे नियंत्रण! या ठिकाणी घ्या प्रशिक्षण..

माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबीयांनी सांगितले की, इरफान रात्रभर गेम विषयी बरळत होता. कुटुंबीयांना अनेकदा समजावून देखील इरफान ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. एवढंच. नाही तर तो सकाळी उठून रस्त्यावर वेड्यासारखा पळत सुटला.

त्यानंतर तो वेड्यासारखा वागू लागला आणि ‘हॅकर आला, पासवर्ड बदलला (Password Change), आयडी लॉक (ID Lock) झाला,’ अशी बडबड करू लागला. यावेळी त्याला गावातील तसेच कुटुंबातील व्यक्ती पकडून दोरीने बांधून ठेवले.

तसेच, 2016 मध्ये फक्त सेल्फी काढताना अपघात होऊन 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात ही संख्या 125च्य़ा घरात आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं, हेडफोन्सवर गाणी ऐकत रस्ता, ट्रॅक क्रॉस करताना होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही मोठं आहे. शिवाय रोज बाजारात येणारी नवनवी अॅप्स तरुणाईला आकर्षित करतात. यात रेपोसो, कँडी कॅमेरा, इन्स्टाग्राम आघाडीवर आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button