ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

केंद्र सरकारची घोषणा; सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांनो त्वरित किसान क्रेडिट कार्ड “असे” मिळवा..

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांच्या (farmers) हितासाठी एक मोठा निर्णय घेत आहे. केंद्रीय कृषिमंत्री (Union Minister of Agriculture) नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे की, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) दिले जाईल. त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. कोरोना काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) दिले गेले आहेत. सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) अंतर्गत आणण्यासाठी सरकार गेल्या वर्षापासून मोहिमेद्वारे प्रयत्न करत असताना दिसत आहे.

फक्त 7% व्याजदराने मिळणार कर्ज

शेतीसहित पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनालाही (Animal Husbandry and Fisheries) किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे (Kisan Credit Card) सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी त्याला सरकारकडून 2% सबसिडी मिळते. याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जावर फक्त 7% व्याज भरावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा –

😍 केंद्र सरकारचा मोठा निर्णय; किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 16 कोटी कर्ज वितरण करण्याचे ठेवले उद्दिष्टे..

किसान क्रेडिट कार्ड असे मिळवा –

https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जाऊन इथून किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) फॉर्म डाउनलोड करा.

हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पिकांच्या तपशीलांसह भरावा लागेल.

इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही. असे तुम्हाला सांगावे लागेल.

यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड कोण घेऊ शकते?

दुसऱ्याच्या जमिनीवर शेती (Agriculture) करत असेल शेती, मत्स्यपालन आणि पशुपालनाशी (Fisheries and Animal Husbandry) संबंधित कोणतीही व्यक्ती तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असावे. जर शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर सह-अर्जदार देखील आवश्यक असेल. ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे. शेतकऱ्याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी तुम्ही पात्र आहेत की नाही हे पाहिले जाईल.

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे –

ओळखपत्रासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. त्याचवेळी, मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स हे एड्रेस प्रूफ म्हणून पाहिले जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button