ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Business Idea | शेतकरी होणार करोडपती! एकाच हेक्टरमध्ये ‘या’ पिकाच्या लागवडीतून मिळेल तब्बल 7 पटींनी अधिक नफा

Business Idea | पारंपरिक पिकांच्या लागवडीतील नफा सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना (Business Idea) नवीन पिके घेण्याचा सल्ला देत आहे. तसेच आजकाल शेती हे केवळ उपजीविकेचे साधन राहिलेले नाही. अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agriculture) वळत आहेत आणि भरघोस कमाई करत आहेत. आता भारतातील शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नगदी आणि औषधी वनस्पतींची लागवड करत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक (Financial) उत्पन्न वाढण्यास देखील मोठी मदत होत आहे. तुम्हालाही बंपर कमाईचे पीक (Business Idea) घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या खर्चाच्या कितीतरी पट नफा कमवू शकता.

अश्वगंधा शेती
आज आम्ही तुम्हाला अश्वगंधा शेतीबद्दल सांगत आहोत. अश्वगंधाची लागवड (Cultivation of Ashwagandha) करून शेतकरी कमी वेळात अधिक नफा मिळवून श्रीमंत होऊ शकतात. भारतात अश्वगंधाची लागवड हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये केली जाते. खाऱ्या पाण्यातही याची लागवड करता येते.

वाचाआनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?

कशी केली जाते लागवड?
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात याची लागवड केली जाते. चांगल्या पिकासाठी जमिनीत ओलावा आणि कोरडे हवामान असावे. रब्बी हंगामात पाऊस झाल्यास पीक चांगले येते. नांगरणी करताना सेंद्रिय खते (Organic Fertilizer) शेतात टाकली जातात. पेरणीसाठी हेक्टरी 10-12 किलो बियाणे पुरेसे आहे. 7-8 दिवसात बियाणे उगवतात. वालुकामय चिकणमाती आणि लाल माती त्याच्या लागवडीसाठी चांगली मानली गेली आहे. ज्या मातीचे पीएच मूल्य 7.5 ते 8 दरम्यान असते, त्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते. 20-35 अंश तापमान आणि 500 ​​ते 750 मिमी पाऊस रोपांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक आहे. अश्वगंधा रोपाची कापणी जानेवारी ते मार्च या कालावधीत केली जाते.

इतर पिकांपेक्षा होईल मोठी कमाई
गव्हापेक्षा अधिक कमाई करणारे अश्वगंधा हे सर्व औषधी वनस्पतींमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी अश्वगंधा सर्वात फायदेशीर मानली जाते. अश्वगंधाच्या अनेक उपयोगांमुळे तिची मागणी नेहमीच राहते. अश्वगंधाची फळे, बिया आणि साल वापरून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. त्याची लागवड करून शेतकरी भात, गहू, मका यापेक्षा 50 टक्क्यांपर्यंत अधिक नफा मिळवू शकतात. देशात अश्वगंधाचे उत्पादन 1600 टन आहे. तर त्याची मागणी वार्षिक 7000 टन आहे. अशा परिस्थितीत शेतकरी त्याच्या उत्पादनातून मोठी कमाई करू शकतात.

वाचाब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

कमी खर्चात अधिक नफा
बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर अश्वगंधाची लागवड करत आहेत. अश्वगंधाच्या मुळाला घोड्यासारखा वास येतो. त्यामुळे तिला अश्वगंधा म्हणतात. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. ही एक झुडूप असलेली वनस्पती आहे. खर्चापेक्षा अनेक पट नफा मिळत असल्याने याला नगदी पीक असेही म्हणतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will become millionaires! Cultivation of crop in a single hectare will yield up to 7 times more profit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button