ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Business Idea | शेतकऱ्यांचं नशीबच बदलणारं! ‘या’ पिकाला सोन्याहून अधिक भाव, 64 हजार प्रतिक्विंटल मिळतोय भाव

Business Idea | सोन्याच्या दराप्रमाणेच जिऱ्याचे भावही कुलांचेवर आदळत आहेत. राजस्थानच्या नागौरमध्ये जिऱ्याच्या दराने 64 हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. जिऱ्याची (Cumin Rate) मागणी पाहता त्याचा भाव 70 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा कृषी व्यवसाय (Business Idea) चांगला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

जिऱ्यासह इसबगोल आणि बडीशेपच्या दरातही झाली वाढ
जिऱ्याच्या वाढत्या भावामुळे शेतकरी सुखावला आहे. मोठ्या प्रमाणावर ते त्यांच्या उत्पादनासह बाजारपेठेत पोहोचत आहेत. जिर्‍याबरोबरच इसबगोलाचाही भाव यावेळी 27 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. त्याचबरोबर एका जातीची बडीशेपही 28 हजार प्रतिक्विंटल दराने विकली जात आहे. जिरे, बडीशेप, इसबगोल या पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची चांदी झाली आहे.

जिऱ्याची मागणी का वाढली?

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिऱ्याला मोठी मागणी असल्याचे जिऱ्याचे व्यापारी अखिलेश गढवार यांनी सांगितले. हवामानाच्या अनिश्चिततेमुळे जिरे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अशा परिस्थितीत मागणीनुसार जिरे बाजारात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळेच बाजारात जिऱ्याचे दर झपाट्याने वाढले आहेत.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

जिऱ्याचा भाव अवघ्या दोन महिन्यात पोहोचला 50 ते 60 हजारांवर

एप्रिलपासून जिऱ्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 12 एप्रिललाच जिऱ्याचा दर 50 हजारांच्या पुढे गेला होता. त्याचा दर आता अवघ्या दोन महिन्यांच्या अंतराने 60 हजारांच्या पुढे गेला आहे. जिऱ्याचे दर असेच वाढत राहिल्यास हा दरही 70 हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचू शकतो

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: The fate of farmers will change! This crop fetches more than gold, 64 thousand per quintal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button