ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मोठी बातमी; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला हा निर्णय..

Big news; Sugarcane growers will get better prices, the decision was taken by the Union Cabinet.

केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी इथेनॉलच्या (ethanol) किमती 80 पैशांपासून ते 2.55 रुपये प्रति लिटरने वाढविल्या आहेत. त्यामुळे उसावर आधारित इथेनॉलची (ethanol) किंमत 62.65 रुपयांवरून 63.45 रुपये प्रतिलिटर होणार आहे. इथेनॉलच्या (ethanol) नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले आहे.

इथेनॉलच्या ब श्रेणीसाठी किंमत –

बी श्रेणीच्या सेरामधून मिळणाऱ्या इथेनॉलची (ethanol) किंमत सध्या 57.61 रुपये प्रति लिटरवरून 2.55 रुपयांनी वाढवून 59.08 रुपये प्रति लिटर केली आहे. त्याचवेळी सी श्रेणीच्या सेरामधील इथेनॉलची किंमत 44.54 रुपयांवरून 2.12 रुपयांनी वाढवून 46.66 रुपये प्रति लिटर केली. यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्र सरकारने (center government) उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमतीत प्रतिलिटर 3.34 रुपयांनी वाढ केली होती.

हे ही वाचा – राज्य सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीची उर्वरित 25 टक्के रक्कम जाहीर, दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार…

20 टक्के इथेनॉल मिश्रणावर काम सुरू

इथेनॉलच्या (ethanol) किमती वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळणार. सरकार 10% इथेनॉल (ethanol) मिश्रित पेट्रोल विकणाऱ्या भागात इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम लागू करत आहे. सरकार जून 2021 पासून 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या योजनेवर काम करत आहे, याची अंमलबजावणी एप्रिल 2025 पासून करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हे ही वाचा – या” कारखान्याची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना एकरकमी FRP 2950 रुपये देणार असल्याचे केले जाहीर..

12 राज्यांतील शेतकऱ्यांना फायदा –

इथेनॉलच्या किमती वाढल्याचा फायदा देशातील 12 राज्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. उसाच्या कडब्यापासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या पुरवठा वर्षात 59.48 रुपये प्रति लिटरवरून आता 62.65 रुपये प्रति लिटर करण्यात आली.

हे ही वाचा –

राज्य शासनाचा मोठा निर्णय; “या” बागायदार शेतकऱ्यांना व्याज दरात भांडवल उपलब्ध करून देणार..

मोठी बातमी; शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची ने-आण करण्यासाठी रेल्वेकडून ५०% अनुदान, सुविधा पहा सविस्तर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button