मी E-शेतकरी

मोठी बातमी; पुढील 5 दिवस या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा…

monsoon

श्रीलंका आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rainfall in maharashtra) हजेरी लावली आहे, गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरसह दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

वाचा

यानंतर आता अरबी समुद्रात देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rainfall) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. खरंतर, देशात सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा सह या जिल्ह्यांना यलो अलर्ट –

त्यामुळे दक्षिण भारतातील बहुतांशी राज्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

वाचा –

या ठिकानी ढगाळ हवामानाची नोंद –

पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहणार असून हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असेल. यासोबतच रायगड, पुणे, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांत देखील आज अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासात या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

पुण्यात यलो अलर्ट –

उद्यापासून पुढील चार राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची धुवाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –


Posted

in

by

Tags: