ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! थेट ‘रेशन आपल्या दारी’ उपक्रमास सुरुवात, राज्य शासनाचा मोठा निर्णय

Ration Card | राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन मोठं मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. जेणेकरून या निर्णयांचा फायदा सामान्य जनतेला होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतले जातात. आता रेशन कार्ड (Ration Card) धारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रेशन कार्डधारक (Ration Card) आनंदाने बहरून जाणार आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

थेट येणार रेशन आपल्या दारी
नुकताच आता रेशन कार्डधारकांसाठी मंत्रालयीन बैठकीत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रालयात बैठकीमध्ये राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानंतर रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात पाण्याची गरज भासणार नाही. कारण आता ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कसे मिळणार धान्य?
आता मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये ‘रेशन आपल्या दारी’ हा उपक्रम देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आता या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना शिधा घेण्यासाठी दुकानात जावे लागणार नाही. तर आता फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. तसेच या योजनेची लवकरात लवकर अमंलबजावणी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

Web Title: Good news for ration card holders! A big decision of the state government to start the ‘Ration Aipana Dari’ initiative directly

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button