ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर करणार थेट केडक कारवाई, जाणून घ्या नेमका निर्णय काय?

Eknath Shinde | आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. म्हणूनच शेतीच्या (Agriculture News) कामांची लगबग सुरू होते. शेतीमधील नांगरणी, पेरणी (Selection Seed) या कामांना वेग येतो. परंतु शेतकरी मित्रांना पेरणीपूर्वी बियाण्यांची खरेदी करणे आवश्यक असते. मात्र शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. म्हणूनच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पथके तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. बियाणे विक्रेते योग्य बियाणे, योग्य दरात विकताहेत की, नाही ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

योग्य बियाण्यांची करा निवड
शेतकऱ्यांनी पूर्वीच्या हंगामात इतर शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घेणे गरजचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक अंदाज येईल. त्याचबरोबर पिकाची लागवड आणि पुढचे व्यवस्थापन पद्धती तज्ज्ञांकडून समजावून घेणे. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याच्या दुकानातूनच खरेदी करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.

Web Title: Chief Minister’s big decision! Direct action will be taken against those who cheat the farmers, know exactly what is Ninary?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button