lang="en-US"> ५ रुपये अनुदान मिळवायचं? फक्त गाईचं टॅगिंग करा आणि या प्रकारे ऑनलाइन नोंदणी! - मी E-शेतकरी

५ रुपये अनुदान मिळवायचं? फक्त गाईचं टॅगिंग करा आणि या प्रकारे ऑनलाइन नोंदणी!

नाशिक, २८ जानेवारी २०२४: महाराष्ट्र सरकारने राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना त्यांच्या पशुधनाचे युनिक इअर टॅगिंग करून त्यांची ऑनलाइन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यात पशुपालकांचा आपल्या पशुधनाच्या कानाला १२ अंकी युनिक इअर टॅगिंग प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात १६ हजार २४६ पशुधनाची आणि ३ हजार ३७१ पशुपालकांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे.

‘भारत पशुधन ॲप’वर जनावरांच्या मालकी हस्तांतरणाची नोंदणी ७ हजार ६३४, नोंदीत केलेले बदल ३ हजार ६९१, आणि पशुपालकांच्या नावात केलेले बदल ९५८ इतके कामकाज करण्यात आले आहे.

पशुधनास वेळीच टॅगिंग होण्यासाठी अतिरिक्त १ लाख ४२ हजार इतका टॅगचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात आला आहे.

या अनुदानामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

वाचा | PM Awas Yojna | मकर संक्रातीच्या मुहूर्तावर पीएम आवास योजनेचे ५४० कोटी रुपयांचे हप्ते ग्रामीण लाभार्थ्यांना

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा

अनुदानाची रक्कम आणि कालावधी

अधिक माहितीसाठी

Web Title : Want to get Rs 5 subsidy? Just tag the cow and register online this way!

Exit mobile version