ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

सावधान,निसर्गाचाही सुरू झाला मनमर्जी कारभार! हवामान बदलामुळे एवढ्या लोकांनी गमावले प्राण…

सततच्या हवामान बदलाने जवळ जवळ सगळेच लोक हैराण झाले आहे. निसर्गचक्र बदलत असल्याच्या शंकाही तज्ज्ञांकडून सांगितल्या जात आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अभ्यासानुसार २०२१ साली निसर्गाच्या बदलांचा सगळ्यात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. विविध नैसर्गिक संकटांमुळे जवळजवळ ३४० जणांना प्राणही गमवावे लागले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

वाचा –

राज्यातील सध्याचे हवामान

राज्यात सध्या थंडी असून दोन तीन अंशांनी तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विदर्भात काही ठिकणी पाऊसाच्या सरी बरसत असून लवकरच उघडीप होण्याची शक्यता आहे. आजपासून तापमान वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासह काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता.

वाचा –

म्हणून उत्तर भारतात आहे थंडी

हिमालय पर्वत आणि परिसरावर होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. तसेच मध्यप्रदेश,गुजरात, पंजाब,हरियाना आणि चंदिगड मध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी असणार आहे.

काळजी घेण्याची गरज

निसर्गात बदलत चाललेल्या हवामानामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असून हवामानाचा अभ्यास करून शेती व कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button