ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Bank Holiday | फेब्रुवारी महिन्यामध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, कामकाजाची आव्हाने; जाणून घ्या सविस्तर

Bank Holiday | In the month of February, bank holidays, know the challenges of working in detail

Bank Holiday | फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस (Bank Holiday) बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा पाहून घ्या.

बँकांना 14 दिवस सुट्टी

फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक सण असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये बँकांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण पाच दिवस सुट्ट्या आहेत. त्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुट्टी यांचा समावेश केल्यास नोव्हेंबर महिन्यात 14 दिवस सुट्ट्या आहेत. याशिवाय रविवारच्या सुट्ट्या आहेत.

वाचा | Agricultural Technology | शेतात रोबोटिक्सची क्रांती; कशी कापणी आणि शेतीचे स्वरूप बदलत आहे?

Bank Holiday List In February : फेब्रुवारी महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी

  • 4 फेब्रुवारी : रविवार
  • 10 फेब्रुवारी : दूसरा शनिवार
  • 11 फेब्रुवारी : रविवार
  • 10 ते 12 फेब्रुवारी : लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी
  • 14 फेब्रुवारी : वसंत पंचमी निमित्त हरयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
  • 15 फेब्रुवारी : लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
  • 18 फेब्रुवारी : रविवार
  • 19 फेब्रुवारी : छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकांना बंद राहतील.
  • 20 फेब्रुवारी : मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी
  • 24 फेब्रुवारी : चौथा
    शनिवार
  • 25 फेब्रुवारी : रविवार

बँकांच्या कामकाजावर परिणाम

फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांमुळे अनेकांना अडचणी येऊ शकतात. बँकांमध्ये पैसे जमा करणे, काढणे, चेकची रक्कम भरणे, कर्जाचे हप्ते भरणे, खाते उघडणे आणि बंद करणे यासारख्या कामांसाठी बँकेत जावे लागते. मात्र, सुट्टीच्या काळात बँका बंद असल्याने या कामांसाठी लोकांना अडकून पडावे लागेल.

ऑनलाइन बँकिंगचा पर्याय

फेब्रुवारी महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांमुळे लोकांना ऑनलाइन बँकिंगचा पर्याय वापरायला भाग पडू शकतो. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून पैसे जमा करणे, काढणे, चेकची रक्कम भरणे, कर्जाचे हप्ते भरणे, खाते उघडणे आणि बंद करणे यासारख्या कामांसाठी बँकेत जाण्याची गरज नाही.

बँकांच्या सुट्ट्यांची यादी लक्षात ठेवा

फेब्रुवारी महिन्यात बँकांना सुट्टी असल्याने बँकेत जाण्यापूर्वी बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक (Bank Holiday List) एकदा पाहून घ्या. यामुळे तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

Web Title : Bank Holiday | In the month of February, bank holidays, know the challenges of working in detail

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button