ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

PM Kisan | पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी ‘ही’ अट करा पूर्ण ; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

PM Kisan | पीएम किसान योजना (PM kisan Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना अर्थसहाय्य केले जाते. देशातले बहुसंख्य शेतकरी सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही हप्त्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधी मिळतो. दोन हजार प्रति हप्ता या प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार मिळतात.

14 th Installment | १४ व्या हप्त्यासाठी ही अट बंधनकारक

पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. मात्र शेतकरी आता पुढच्या म्हणजेच १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास (Aadhar Number) जोडणे बंधनकारक केले आहे.

बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार

यामुळे बँक खाते ( Bank Account) आधार क्रमांकास जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. तेथील पोस्ट मास्टर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडून देण्यासाठी मदत करणार आहेत.

IPPB | इंडिया पोस्ट पेमेंट बँक देणार सुविधा

यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसला भेट द्यावी.
यानंतर पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी अवघ्या ४८ तासात जोडले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गावपातळीवर मोहीम राबवणार

महत्त्वाची बाब म्हणजे आयपीपीबी मार्फत १ ते १५ मे या कालावधीत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Bank account should be connected with aadhar number for next installment of pm kisan yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button