ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan | अवघ्या काहीच तासांत शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार 6 हजार; एकाचवेळी पीएम किसान अन् नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार

PM Kisan | 6 thousand will come to the account of farmers in just a few hours; At the same time, the money of PM Kisan and Namo Shetkari Yojana will be received

PM Kisan | आज 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात, जे 3 हप्त्यांत 2 हजार रुपये प्रति हप्ता असे वितरित केले जातात. आज शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे.

ई-केवायसी अनिवार्य:
या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही ते पीएम किसान पोर्टल (https://pmkisan.gov.in/) च्या माध्यमातून किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन करू शकता.

वाचा | Fruit Crop Insurance | फळ पीक विमा जमा.. शेतकऱ्यांना दिलासा! ८१ कोटींचा विमा परतावा खात्यात..

  • तुमचं नाव कसं चेक करावं?
  • पीएम किसानची अधिकृत वेबसाइट (https://pmkisan.gov.in/) वर जा.
  • ‘लाभार्थी यादी’ टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप-डाउन मेनूमधून राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  • ‘Get Report’ टॅबवर क्लिक करा.
  • ई-केवायसी कशी करावी?
  • पीएम किसानची अधिकृत वेबसाइटवर जा.
  • OTP च्या माध्यमातून ई-केवायसी करा.
  • तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊनही ई-केवायसी करू शकता.
  • नुकतेच सरकारने ई-केवायसीसाठी मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. या माध्यमातून तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता.
  • हेल्पलाइन:
  • तुम्हाला ई-केवायसी किंवा इतर कोणत्याही बाबतीत मदत हवी असल्यास तुम्ही हेल्पलाइन नंबर 155261 आणि 011-24300606 वर कॉल करू शकता.

Web Title | PM Kisan | 6 thousand will come to the account of farmers in just a few hours; At the same time, the money of PM Kisan and Namo Shetkari Yojana will be received

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button