ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची ‘इतकी’ रक्कम देण्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Department of Agriculture) 72 तासांच्या आत पिक विमा कंपन्यांना आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी दावे केले होते. आता पीक विमा (Crop Insurance) कंपनीला दावे करण्यात आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला (Agriculture) त्याच्या दाव्यासाठी रक्कम ही पीक विमा कंपन्यांना द्यावीच लागणार आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पिक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

वाचा: बिग ब्रेकिंग! राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ, जाणून घ्या किती मिळणार रक्कम?

पीक विम्यासंदर्भात बैठक पडली पार
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रालयामध्ये पीक विम्यायासंदर्भात बैठक घेतली. त्याचवेळी 5 पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पीक विमा कंपन्यांनी 15 डिसेंबरपर्यंत 1हजार 966 कोटी 63 लाख रुपयांचा विमा शेतकऱ्यांना दिल्याची माहिती दिली. तसेच 447 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देणे प्रलंबित आहे. राज्यातील 96 लाख 91 हजार 412 विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर या शेतकऱ्यांना 2 हजार 413 कोटी 69 लाख रुपयांची मदत निश्चित केली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेती करणं होणारं सोपं; ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणारं 4 लाख

कृषीमंत्र्यांनी दिले ‘हे’ उद्देश
या बैठकीमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत विचारणा केली. याबाबत माहिती देताना पिक विमा कंपन्यांनी सांगितले की, काही शेतकऱ्यांनी विविध पिकाचे विविध दावे केले आहेत. त्यामुळे त्यांना त्या दाव्याप्रमाणेच रक्कम जाहीर करण्यात आली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांची रक्कम ही 1 हजारांच्या आत असल्याचे पिक विमा कंपन्यांनी सांगितले. त्याचवेळी अब्दुल सत्तार यांनी कोणत्याही शेतकऱ्यांना एक हजारांच्या आत पिक विम्याची रक्कम देऊ नये असे निर्देश दिले. अब्दुल सत्तार यांचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कृषी तंत्राने कापसाचे उत्पादन निघेल 50% जास्त, जाणून घ्या सविस्तर

कालच राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यासाठी राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना 5 हजार 439 कोटींचा निधी तरतूद केली आली आहे. आता या अंतर्गत शेतकऱ्यांना जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपये प्रती हेक्टर एवजी अफा 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात येणार आहे. तसेच बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 प्रती हेक्टर एवजी आता 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रती हेक्टर एवजी आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. आता दुप्पटीने मदत जाहीर झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Agriculture Minister Abdul Sattar’s directive to pay amount of crop insurance to the affected farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button