कृषी बातम्या

PM Kisan Yojana| कृषी व महसूल विभागाच्या शीतयुद्धाचा शेतकऱ्यांना बसतोय चटका! ई-केवायसीही ठरतेय डोकेदुखी

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून ( central goverment) पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा होतात. राज्यातील जवळ जवळ एक कोटी चौदा लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी (registration) केली आहे. मात्र आता यामध्ये काही शेतकऱ्यांना त्रुटी आढळल्या असून त्यांचे पैसे जमा झाले नाहीत. यावरून कृषी आणि महसूल विभागात सुप्त संघर्ष सुरू आहे.

या आहेत शेतकऱ्यांच्या त्रुटी

पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी केलेल्या आठ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये बँक खाते चुकने, आधार नंबर मॅच न होणे, पैसे जमाच न होणे यांचा समावेश आहे. या त्रुटी दूर करण्याचे काम हे कृषी विभागाचे व महसूल विभागाचे आहे.परंतु महसूलच्या महाराष्ट्र तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने १५ मार्च पासून हे काम करणे बंद केले आहे. याशिवाय या कामाचे हस्तांतरण करून घ्यावे असे पत्रच मुख्य सचिवांना दिले आहे. या वादामुळे राज्यातील ८ लाख शेतकऱ्यांच्या तब्बल ५३१ कोटींच्या निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

म्हणून महसूल विभागाने झटकले हात

संपूर्ण देशात ही योजना सुरु आहे. इतर राज्यात कृषी विभाग या योजनेचे बहुतेक काम बघते मात्र महाराष्ट्र राज्यात केवळ कृषी प्रधान सचिव आणि कृषी आयुक्त असे कृषी विभागाचे दोनच अधिकारी या योजनेवर नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. यामुळे महसूल विभागावर कामाचा अधिक ताण येतोय.म्हणून महसूल विभागाने कामातून हात झटकले आहेत. या वादात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

ई- केवायसी सुद्धा ठरतीये डोकेदुखी

PM किसान योजनेत मध्यंतरी झालेल्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना ई- केवायसी (E-Kyc) व आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. मात्र ई- केवायसीसाठी ऑनलाइन सर्व्हिस सेंटरवाले शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करत आहेत. याशिवाय PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला सतत येणाऱ्या अडथळ्यांनाही शेतकरी कंटाळले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button