ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agriculture Week Baramati | पवारांच्या बारामतीत दिसणार कृषी पॉवर! आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी भरणार कृषक सप्ताह….

Agriculture Week Baramati | शेती व्यवसायाला चालना मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. याच दृष्टीकोनातून बारामती शहरात कृषक कृषी तंत्रज्ञान सप्ताह ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे अशी माहिती अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी दिली.

वाचा –

असा असेल कृषक कृषि सप्ताह

कृषक कृषी सप्ताहामध्ये शेती आणि शेती पूरक व्यवसाय, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली व पर्यावरण पूरक शेती या संदर्भातील त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने या पुढील काळात पर्यावरणाचा समतोल साधून शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. या गोष्टींच्या अभ्यासासाठी (Study) हा सप्ताह फायदेशीर ठरणार असून या सप्ताहात (week) शेतकऱ्यांना खालील बाबींवर मार्गदर्शन केले जाईल.

१) होमिओपॅथी व आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा कृषी क्षेत्रात प्रभावी वापर.

२) विषमुक्त शेती

३) जिवंत प्रात्यक्षिक, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती व पशुरोग निदान सुविधा पाहणे

४) भाजीपाला गुणवत्ता केंद्रात भाजीपाला लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान व एक्सपोर्ट (Export)

५) शेती पूरक प्रयोग, व्यवसाय व योजना

कृषक साठी यांची उपस्थिती असणार…

या सप्ताहात शेतीविषयक अनेक समस्यांवर देखील चर्चा करण्यात येणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सप्ताहा दरम्यान कृषकला भेट देणार आहेत.

नोंदणी व प्रवेश प्रक्रिया

कृषक सप्ताह बारामती येथील शारदानागर कृषी विज्ञान केंद्रात ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत होणार असून प्रवेशासाठी प्रत्येकाजवळ आधारकार्ड असणे आवश्यक आहे. दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान सशुल्क प्रवेश असणार असून रविवारी १३ फेब्रुवारी रोजी मोफत प्रवेश असणार आहे. सप्ताहासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik या लिंक वरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button