ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Subsidy | शेतकऱ्यांनो यंदाची दिवाळी होणार दणक्यात साजरी, 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान होणार खात्यात जमा

Subsidy | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची सप्टेंबर महिन्यात वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे. ज्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात हे अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
फुले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2021 च्या अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजारांची रक्कम 15 सप्टेंबर पासून जमा होणार आहे. यासाठी 2017-18-19-20 वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरतील.

वाचा: शेतकऱ्यांनो दिवसाला 45 रुपये वाचवा अन् 25 लाखांचे व्हा मालक, एलआयसीची ‘ही’ योजना देतेय सुवर्णसंधी

यंदाची दिवाळी दणक्यात होणार साजरी
यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. कारण येत्या सप्टेंबर महिन्यात 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाचे वाटप होणार आहे. दिवाळीपूर्वी या अनुदानाचे वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी मोठ्या जोमात आणि जल्लोषात साजरी होणार आहे. कारणं दिवाळीसाठी या अनुदाच्या पैशांचा शेतकरी लाभ घेऊ शकतात.

वाचा: काय सांगता? बाजारात ‘या’ भेंडीला तब्बल 500 रुपये प्रति किलो मिळतोय भाव, जाणून घ्या सविस्तर…

अनुदानाच्या लाभासाठी तात्काळ करा ‘ही’ प्रक्रिया
मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केले नाही त्यांना हे अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येईल. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करावे लागेल. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुमचे नाव या लाभार्थी यादीमध्ये येईल. अन्यथा तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लिंकिंग प्रक्रिया करून घ्यावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will celebrate this year’s Diwali with a bang, incentive subsidy of 50 thousand will be deposited in the account

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button