ताज्या बातम्या

पाडव्याच्या मुहूर्ताआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २०० कोटींची कर्जमाफी | सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची ‘ही’ घोषणा वाचा…

मुबंई : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात (budget 2022-23) अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमाफीचा (loan wavier) प्रश्न निकालात लावला गेला. याच पार्श्वभूमीवर उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी मार्च अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे.

राज्यातील ५४ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. यामधून राज्यातील ३१ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला होता. आता उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारने पाऊल (goverment’s step) उचलले असून मार्च अखेरपर्यंत राज्यातील ५४ हजार शेतकऱ्यांना २०० कोटींची कर्जमाफी मिळणार आहे.

म्हणून झाला उशीर

महाविकास सत्तेत येताच काही दिवसातच कोरोनाचे संकट आले. यावेळी वैद्यकीय सोयी सुविधा (medical facilities) व इतर गोष्टींमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडला. यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यास उशीर झाला होता. सहकार मंत्री (minister of co – operation) बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत या संबंधित माहिती देत लवकरात लवलर कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी बँकांनी ३५ लाख थकीत कर्जदारांची माहिती सरकारला दिली असून त्यानुसार ही कर्जमाफी दिली जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button