ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

“या” शेतकऱ्यांना 1.27 लाख रुपयांचा बोनस जाहीर; 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, पहा सविस्तर माहिती.

.

धान उत्पादकांसाठी (grains producer) एक आनंदाची बातमी आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गत खरीप हंगामात धानाच्या 1868 रुपये हमीभावात प्रति क्विंटल 700 रुपयांचा सानुग्रह अनुदान अगोदर जाहीर केले होते. तब्बल सात महिन्यानंतर पहिल्या टप्प्यातील 50 व दोन महिन्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील 50 टक्के बोनस शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाला आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे.

वाचा –

1️⃣ कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संशयास्पद कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी नोंदवली तक्रार..

महत्वाचं म्हणजे 700 रुपयांची वाढ झाल्याने शेतकर्‍यांना 2568 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील काही भागात धानाचे पीक घेतले जाते. गोदिया जिल्ह्यात गत खरीप हंगामात 1 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन घेण्यात आले. उत्पादन खर्चाच्या तुलणेत धानाला हमी दर कमी असल्याने महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यात 700 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला होता.

शेतकर्‍यांच्या खात्यात 223 कोटी 91 लाख 72 हजार 726 रुपये वर्ग –

जुलै मध्ये पहील्या टप्प्यातील 50 टक्के रक्कम वर्ग केली. यानंतर ऑगस्ट मध्ये दुसर्‍या टप्प्यातील 50 टक्के रक्कम दिली. गत खरीप हंगामात पणन कार्यालयाला जिल्ह्यातील 1 लाख 27 हजार 617 शेतकर्‍यांनी 33 लाख 9 हजार 640 क्विंटल धान विक्री केले. शासनाकडून 224 कोटी 72 लाख 51 हजार 336 रुपये प्राप्त झाले. 1 लाख 27 हजार 497 शेतकर्‍यांच्या खात्यात 223 कोटी 91 लाख 72 हजार 726 रुपये वर्ग करण्यात आले. या रकमेचा धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button