ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Bhu Vikas Bank | भूविकास बँकांना येणार अच्छे दिन ! शेतकरी होणार खुश…दोन दिवसात 30 हजार शेतकरी कर्जमुक्त करण्याचा सरकारचा ‘हा’ निर्णय ….

Bhu Vikas Bank | सरकार शेतकऱ्यांना विविध सोयी व सुविधा पुरवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. राज्यात सध्या पिकांच्या नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी भूविकास बँकांमध्ये (Bhuvikas Bank ) केली जाणार असून येत्या दोन दिवसांत राज्यातील जवळजवळ तीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा हा कर्ज मुक्त होणार आहे.

उद्या निर्णय होण्याची शक्यता

महा विकास आघाडी सरकारने 18 ऑगस्ट 2021 रोजी भूविकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज (Loan) माफी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने थकबाकी तसेच कर्मचाऱ्यांची देणी, मालमत्ता याची माहिती मागवली आहे. यामुळे उद्या कर्जमाफीची घोषणा होणार शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये १००२ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत.

वाचा: PM Kisan | शासनाचा लेट पण थेट निर्णय ! खरीप पीक विमा योजनेचा चक्क ८६५.९५ कोटी निधी लवकरच वितरित होणार; जाणून घ्या सविस्तर बातमी..

भूविकास बँकांची भूमिका महत्त्वाची

अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यामध्ये भूविकास बँकांची (Bhuvikas bank) भूमिका महत्त्वाची आहे. याशिवाय शेती क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा झाल्यामुळेच ग्रामीण भागामध्ये 25 ते 30 वर्षापूर्वी सिंचनाचे क्षेत्र वाढले. यामुळेच शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासात भूविकास बँकांचे योगदान खूप मोठे आहे. सरकारच्या कर्जमाफी ( loan waiver) च्या निर्णयाने भूविकास बँका व शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button