ताज्या बातम्या

Bank Holidays|बँकेला एप्रिलमध्ये 9 दिवस सुट्ट्या ! वेळे अगोदर महत्त्वाची कामे करून घ्या..

आर्थिक वर्षानुसार मार्च महिना हा अखेर चा महिना असतो. येत्या एप्रिलपासून नवीन वर्षे चालू होते.मात्र, पहिल्याच महिन्यामध्ये बँका 9 दिवस बंद असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, वीकेंड वगळून एप्रिलमध्ये बँका नऊ दिवस बंद राहणार आहेत.दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तर बँका बंद राहतील.१ एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभाचाहा दिवस असेल आणि त्याच दिवशी महिन्याची पहिली सुट्टी देखील असेल.

Bank Holidays Timetable|एप्रिल 2022 मधील बँकेच्या सुट्ट्यांची यादी मी खालील प्रमाणे आहे –

1 एप्रिल: early closing of accountsमुळे बँका बंद राहतील. आयझॉल, चंदीगड, शिलाँग आणि शिमला वगळता देशातील जवळपास सर्व भागांमध्ये बँका बंद राहतील.
2 एप्रिल: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढी पाडवा/ उगादी सण/ नवरात्र/ तेलुगु नववर्ष दिन/ साजिबू नोंगमापनबा (चेराओबा) मुळे बँका बंद राहतील.
4 एप्रिल : सरहूलच्या निमित्ताने रांचीमध्ये बँका बंद राहणार आहेत.
5 एप्रिल : बाबू जगजीवन राम यांच्या वाढदिवसानिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.
”भाजपने विवेक अग्निहोत्रींना यूट्यूबवर द काश्मीर फाइल्स अपलोड करण्यास सांगावे”
14 एप्रिल: बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ वैसाखी/ तमिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग, बिहू यांमुळे शिलाँग आणि शिमला वगळता देशातील जवळपास सर्व भागात बँका बंद राहतील.
15 एप्रिल: गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष दिन (नबावर्षा)/ हिमाचल डे/ विशू/ बोहाग बिहूच्या निमित्ताने देशातील जवळपास सर्व भागात बँका बंद राहतील.
16 एप्रिल : गुवाहाटीमध्ये बोहाग बिहूच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहणार आहेत
21 एप्रिल : आगरतळामध्ये गरिया पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
19 एप्रिल: शब-ए-कदर/जुमत-उल-विदामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button